असं म्हणतात की, आयुष्याच्या प्रवासात स्वतःची ओळख निर्माण करणे फार महत्त्वाचे असते कारण कोणतीच भाषा, विचार, व्यक्तिमत्व घेऊन माणूस जन्माला येत नाही. संधी सर्वांना समान मिळतात परंतु त्या संधीचं सोनं कसं करायचं हे ज्याचं त्यांने ठरवायचं असतं व या स्पर्धात्मक युगात भरपूर कष्ट, मेहनत करून स्वतःचा ब्रँड स्वतःच विकसित करायचा असतो जर आपल्या ज्ञानावर, बुद्धिमत्तेवर, कौशल्यावर आणि मेहनतीवर आपला विश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही व या सर्वात शिक्षण फार महत्त्वाची भूमिका बजावतात कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण मिळवून देण्याचे काम शिक्षणाचे आहे. भारतीय शिक्षणप्रणालीत शिक्षणाच्या तीन स्तरांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण- हे विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण प्रदान करते जे विद्यार्थ्यांना आयुष्यभर मदत करते.
माध्यमिक शिक्षण- समाजातील बदलत्या वातावरणात राहायला शिकवते.
उच्च शिक्षण- हे व्यक्तीला सामाजिक आणि कौटुंबिक आदर मिळवून देते.
शिक्षणाच्या या तीनही स्तरांना विशेष महत्त्व नक्कीच आहे परंतु, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडवायचे असेल तर या तीन स्तरीय शिक्षण प्रणाली व्यतिरिक्त "मूल्यशिक्षण" हा शिक्षणाचा भाग होणे फार गरजेचे आहे. कारण विद्यार्थ्याला जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अनुभव संपन्न होण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी मूल्यशिक्षण फार महत्त्वाची भूमिका बजावतात कारण मूल्यशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता, व सर्वधर्म सहिष्णुता इत्यादी गोष्टी वाढीस लागतात. एक अधिकारी होण्याच्या तयारीत जर सुरुवातीलाच शिक्षणामध्ये समाजाचा सहभाग घेतल्यास शिक्षण हे समाजाभिमुख बनण्यास मदत होते व सोबतच मूल्यशिक्षणाची जोड विद्यार्थ्यांना मिळाली तर शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होऊन असे शिक्षण मिळालेला विद्यार्थी प्रशासनात गेल्यावर तो लोकाभिमुख कार्य करणारा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवितो हा उद्देश व या मूल्यांची गरज लक्षात घेऊनच डिसेंबर 2016 साली "राजमुद्रा अभ्यासिका" ची स्थापना करण्यात आली. अभ्यासिकेमार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून अभ्यासिकेचे आपले कर्तव्यदक्ष अधिकारी घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना राजमुद्रा अभ्यासिकेशी जोडून त्यांना या मूल्याधारित शिक्षणप्रणालीचा फायदा मिळवून देण्याचा अभ्यासिकेचा मानस आहे.
"पढते चलो..बढते चलो.."


